Supriya Suleनी सांगितला शिवाजी महाराजांचा इतिहास, ED-CBI कारवाईवरुन PM Modiना सुनावलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 18:22 IST2021-12-15T18:22:27+5:302021-12-15T18:22:57+5:30
राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान Narendra Modi मोदींना संसदेत खडे बोल सुनावलेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईवरुन सुळेंनी मोदींना धारेवर धरलंय. Supriya Sule नेमकं काय म्हणाल्या आपल्याला पाहचंय पण त्याआधी त्यांच्या बोलण्याचा संदर्भ पाहू. ईडी आणि सीबीआय या संस्थांकडून राज्यातील नेत्यांवर, त्यांच्या नातेवाईकांवर होत असलेल्या कारवाईचा उल्लेख सुप्रिया सुळेंनी संसदेत केला. शिवरायांनी लढाईत कधीही शत्रुच्या महिला आणि कुटुंबियांवर हल्ला केला नाही, असे खडे बोल सुळेंनी सुनावले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. औरंगजेब आला तर छत्रपती शिवाजी महाराज या मातीत जन्म घेतात असं मोदींचं विधान होतं, त्यावरुनच सुळेंनी मोदींना धारेवर धरलं.