भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांची उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. त्यांना, राष्ट्रवादीकडून राहुल मोटे यांचं आव्हान आहे. मात्र, या मतदारसंघातून एका शाळेतील निवृत्त शिक्षकानेही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, निवडणुकांसाठी चिन्ह निश्चित करताना या शिक्षकाची धांदल उडाली. त्यामुळे काय चिन्हा घ्यावं हेच सूचना झालतं? त्यावेळी तहसिल कार्यालयात हजर असलेल्या एका युवकाने त्या शिक्षकाल लुडो गेम घ्या लई फेमसंय, असे म्हणत लुडो गेमचं चिन्ह सूचवलं होतं