Next

ठाकरेंचं पत्र राज्यपालांच्या जिव्हारी, पत्रातूनच सडेतोर उत्तर; Bhagatsingh Koshyari Uddhav Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 04:40 PM2021-12-30T16:40:57+5:302021-12-30T16:43:07+5:30

Maharashtra Govt vs Governor (Bhagatsingh Koshyari vs Uddhav Thackeray) हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीला राज्यपालांनी मंजुरीच दिली नाही. राज्यपालांना विनंती करुनही निवडणुकीला मंजूरी दिली नाही त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच चिडले. त्यांनी राज्यपालांना खरमरीत भाषेत पत्र पाठवलं, विधिमंडळातील कायदे आणि नियम राज्यपालांच्या अधिकार कक्षेच्या बाहेर आहेत याकडे ठाकरेंनी लक्ष वेधलं. आता ठाकरेंचं हे पत्रं राज्यपालांच्या चांगलंच जिव्हारी लागलं आणि मग राज्यपालांनीही उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहिलं. राज्यपालांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय? थेट पाहुयात...