भाजपच्या तोफाच निकामी करायचं ठाकरेंचं टार्गेट, MVAकडूनही यंत्रणांचा वापर सुरु झालाय? Shivsena vs BJP
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 03:50 PM2022-03-02T15:50:01+5:302022-03-02T15:50:27+5:30
सध्या ठाकरे सरकारमधले एकेक मंत्री केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आहेत. अनिल देशमुख, नवाब मलिक कोठडीत आहेत. अजितदादांच्या ऑफिसेसवर ईडीचे छापे पडले, अनिल परबांच्या कथित बंगल्यावर कारवाई झाली. इतकंच काय तर महाविकास आघाडीशी संबंधित अनेकांची चौकशी सुरु आहे. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि मातोश्रीचे जवळ असणारे यशवंत जाधव यांच्यावर इनकम टॅक्सचे छापे पडले, त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधवांची चौकशी झाली, प्रताप सरनाईकांच्या हॉटेलवर छापे पडले. संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, भावना गवळी, प्राजक्त तनपुरे...यादी मोठी आहे...पण आता हे सगळं सांगायचं कारण म्हणजे महाविकास आघाडीचे नेते एकीकडे टार्गेटवर असताना दुसरीकडे ठाकरे सरकारनं पलटवार सुरु केलाय