Next

आव्हाडांचा गंभीर आरोप, राणेंकडे कोणता सेना नेता गेला होता सगळा इतिहास काढेन | Jitendra Awhad

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 05:43 PM2022-01-19T17:43:54+5:302022-01-19T17:44:56+5:30

ठाणे महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय आणि आता जितेंद्र आव्हाडांनी शिवसेनेवर सर्वात मोठा बॉम्ब टाकलाय. नारायण राणेंकडे कोणता नेता भेटायला गेला होता, का भेटला होता, कोणत्या हॉटेलात भेटला होता सारा इतिहास माहितीये, असा बॉम्ब आव्हाडांनी टाकला. आव्हाड ठाण्यातल्या मोठ्या शिवसेना नेत्याबद्दल हे बोलत होते. त्यामुळे ठाण्यातला कोणता शिवसेना नेता जाऊन नारायण राणेंना भेटला होता, का भेटला होता, आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे होता याची चर्चा सुरु झालीय. आव्हाड नेमकं काय म्हणालेत तो पूर्ण बाईट आपल्याला ऐकायचाय पण सगळ्यात आधी हा वाद सुरु कुठून झाला ते पाहुयात, तर त्याचं झालं असं की रविवारी ठाण्यात खारेगाव रेल्वे उड्डाणपूलाचं उदघाटन होतं. हा पूल कुणामुळे झाला यावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली. या पुलाचं श्रेय शिवसेना नेते घेत असल्याची कुजबूज राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये होती. आव्हाडांनीही उघडपणे हीच नाराजी भर मंचावरुन बोलून दाखवली. आव्हाड यावरच थांबले नाहीत तर त्यांनी एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंना टोमणेही मारले. आता हा सगळा प्रकार ताजा असतानाच आव्हाडांनी एक मोठ्ठा बॉम्ब फोडला, ज्यात त्यांचा रोख ठाण्यातल्या एका बड्या शिवसेना नेत्याकडे होता. आव्हाडांच्य बोलण्यामुळे ठाण्यातला तो शिवसेना नेता कोण याची चर्चा सुरु झालीय. आव्हाड नेमकं काय म्हणाले ऐकुयात...