...तर सुधीर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री असते! Sudhir joshi | Manohar joshi | Naryan Rane
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 10:49 PM2022-02-18T22:49:09+5:302022-02-18T22:49:45+5:30
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं निधन झालं.. वयाच्या ८१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला... Manohar Joshi हे नाव शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून घराघरात पोहोचलं.. पण सुधीर जोशी हे नाव तसं विस्मरणात गेलं... पण सुधीर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होणार होते... पण काही अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे त्यांचं नाव मागे पडलं.. आणि ते महसूल मंत्री झाले.. पण पुढे दुर्दैव आड आलं.. आणि हे खातंही नारायण राणेंकडे गेलं.. जेव्हा शिवसेना आपलं राडा कल्चर मिरवत होती... त्या काळातही सुधीर जोशी हा माणूस आपलं सुसंस्कृत, सुशिक्षित असणं मिरवत होता... बाळासाहेबही गमतीने म्हणत की माझं शिक्षण सोडा.. माझा ड्रायव्हर एमए एलएलबी आहे.... बाळासाहेबांचे सारथी ते मंत्री सुधीर जोशींची कहाणी सच्चा शिवसैनिकाची आहे.. जो अखेरच्या श्वासापर्यंत सेनेच्या सोबत राहिला.