नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथील मुंबई आग्रा महामार्गावरील प्रमीला लॉन्ससमोर गुरुवारी सकाळी 9 पासून ते 10:30 वाजेदरम्यान दोन वळुंची झुंज रंगली. सुमारे दीड तास या रस्तावर संचारबंदीच लागली होती. या झुंजीमुळे नागरिक पण दुरुनच पळ काढत होते. अखेर अग्निशमन दलाला पाचारण करत दोन्ही वळूंवर पाण्याचा मारा केला व दीड तासांची ही झुंज अखेर अग्निशमन दलाने सोडवली.