शौर्य पुरस्कार स्वीकारताना वीरमाता भावूक, पाहा व्हिडीओ | Modi | Ram Nath Kovind | Gallantry Awards
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 02:16 PM2021-11-25T14:16:45+5:302021-11-25T14:28:12+5:30
जम्मू काश्मीरचे एसपीओ बिलाल अहमद मागरे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मरणोत्तर शौर्य पुरस्कारने गौरवण्यात आलं. बिलाल अहमद यांची आई सारा बेगम यांनी मंगळवारी हा शौर्य पुरस्कार स्वीकारला. यावेळी, राष्ट्रपती भवनमध्ये आपल्या मुलाचा पराक्रम ऐकताना सारा बेगम भावूक झाल्या, त्यांना श्वास घेताना त्रास होऊ लागला. हे पाहून बाजूला उभ्या असलेल्या महिला शिपायाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर दिला. यावेळी तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. सारा बेगम यांची अवस्था पाहून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुढे येत त्यांच्याजवळ जाऊन त्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केला. त्यानंतर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही सारा बेगम यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.