मराठीत पाट्या लावणार नाहीच, विरेन शहांचं ठाकरे सरकारला उघड आव्हान | Viren Shah | Marathi Boards
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 14:48 IST2022-01-14T14:47:54+5:302022-01-14T14:48:29+5:30
राज्यातील सर्व दुकानांवरच्या पाट्या मराठीत असायला हव्या, असा निर्णय ठाकरे सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. इतर भाषांमध्येही दुकानांच्या पाट्या लावता येतील पण मराठी अक्षरांचा आकारच मोठा असेल असं ठाकरे सरकारनं स्पष्ट केलं, राज्यातल्या सरसकट सगळ्या दुकानांसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. आता अनेक व्यापारी संघटनांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाला विरोध केलाय, फक्त विरोधच नाही तर पाट्या मराठीत लावणार नाही असं थेट आव्हानही दिलंय. व्यापारी संघटनांचे नेते मानले जाणारे विरेन शहा हे ठाकरे सरकारविरोधात मैदानात उतरलेत. विरेन शहांनी ठाकरे सरकारला काय आव्हान दिलंय, मराठीतून पाटी लावायला प्रॉब्लेम काय आहे, मराठीत पाटी लावा यासाठी कायदा करायची वेळ का आली, मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम हा निर्णय घेण्यात आलाय या आरोपात कितपत तथ्य आहे यावरच बोलुयात पण सगळ्यात आधी बघुयात की मराठीत पाट्या लावायचा नेमका निर्णय काय आहे ते...