Manohar Parrikar यांना BJPतून काढायचा प्लानच होता? मोठा गौप्यस्फोट ऐकाच Utpal Parrikar | BJP
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 02:39 PM2022-01-24T14:39:38+5:302022-01-24T14:40:18+5:30
Utpal Parrikar News : गोवा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्याचवेळी गोवा भाजपत दाणादाण उडालीय. म्हणजे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी बंड केलंय. भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. पणजीतून ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्याचवेळेला आता त्यांनी भाजपवर गंभीर आरोप करायला सुरुवात केलीय. माझ्या वडिलांनाही म्हणजे मनोहर पर्रीकरांनाही भाजपमधून काढायचं होतं, असा गौप्यस्फोट उत्पल यांनी केलाय. उत्पल यांच्या दाव्यामुळे गोव्यात भूकंप आलाय, कारण जे मनोहर पर्रीकर ऑक्सिजन लावला असतानाही विधिमंडळात यायचे, त्यांचं काम अगदी हॉस्पिटलमधून करायचे त्यांचीच हकालपट्टी करायचा डाव भाजपत शिजत होता. खुद्द त्यांच्या मुलानंच हा दावा केलाय. पण असं काय झालं की मनोहर पर्रीकरांना भाजपमधून काढायचं होतं, मनोहर पर्रीकरांवर काय दबाव होता, उत्पल पर्रीकरांचा रोख कुणाकडे आहे, पक्षांतर्गत राजकारण भाजपत इतकं टीपेला पोहचलंय का यावरच बोलुयात पण सगळ्यात आधी बघुयात उत्पल पर्रीकरांनी काय विधान केलंय ते...