Next

पंकजा मुंडेंच्या रस्त्याच्या तक्रारीवर गडकरी काय म्हणाले? Nitin Gadkari Replies to Pankaja Munde

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 10:16 AM2021-09-21T10:16:55+5:302021-09-21T10:17:11+5:30

पंकजा मुंडे विदेशात असल्यामुळे मागील काही दिवसांपासून राजकारणात सक्रिय नव्हत्या. भारतात परतल्यानंतर आता पंकजा मुंडे या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. ओबीसीच्या अध्यादेशावरुन त्यांनी सरकारला टोला लगावला होता. आता पंकजा मुंडेंनी महाराष्ट्रातील एका रस्त्याविषयी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे तक्रार केलीय. पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर भेगा पडल्या असून आपण यासंदर्भात आपण नितीन गडकरींना पत्र लिहिणार असल्याचे पंकजा मुंडेंनी म्हटले आहे. त्यामुळे गडकरी-मुंडे यांच्यात रस्त्याच्या विषयावरून होणारा पत्रव्यवहार चर्चेचा विषय ठरतोय.