समीर वानखेडे प्रकरणात गृहमंत्री काय म्हणाले? Dilip Walse patil Reaction on Sameer Wankhade
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 08:41 PM2021-10-26T20:41:17+5:302021-10-26T20:42:07+5:30
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील एका साक्षीदाराने धक्कादायक आरोप केला आणि या प्रकरणातील अधिकारी समीर वानखेडे अडचणीत आले. या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यांच्या एका व्हिडीओमुळे या कारवाईंबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. प्रभाकर साईलने या प्रकरणात 25 कोटीची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत अधिक आक्रमक झाले आहेत. तर साईल यांनी केलेल्या मागणीनुसार मुंबई पोलिसांकडून त्यांना संरक्षण देण्यात आलं आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर कारवाई करु, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.