सोनू सूदनं असं काय केलं, की ज्यामुळे त्याची नियुक्तीच रद्द केली? Sonu Sood as a Punjab's State Icon
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 02:53 PM2022-01-10T14:53:56+5:302022-01-10T14:54:36+5:30
Sonu Sood steps down as Punjab's 'State Icon', says 'this journey has come to an end' सोनू सूदला कामावरून काढलं, पण कुणी ? अभिनेता सोनू सूद नेहमीच गरजू व्यक्तीच्या पाठीशी उभा राहिल्याचं समोर आलं आहे..कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आली होती. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, काही जणांवर तर उपाशी राहण्याची वेळ देखील आली होती. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हजारो किलो मीटर दुर राहणाऱ्या लोकांना तर घरी कुटुबियांकडे जाण्यासाठी पैसे आणि कुठलेही साधन नव्हते. अशावेळी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद रस्तावर उतरून लोकांची मदत करत होता..त्याने लोकांना त्यांच्या गावी परतण्यासाठी गाड्यांची व्यवस्था असो किंवा त्यांच्या जेवण्याची असो अशी प्रत्येक प्रकारची मदत त्याने लोकांना केली होती..त्याच्या या कामगिरीवर खुश होऊन निवडणूक आयोगाने पंजाबचे स्टेट आयकॉन पद बहाल केले होते.. परंतु आता मात्र सोनू सुदला या पदावरून हटवण्यात आलं आहे..नेमकं घडलं तरी काय, पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून..