ऑनलाइन व्यवहारात अशी होतेय फसवणूक सावधान रहा ! Beware of fraud! While doing online transactions
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 03:52 PM2022-01-10T15:52:27+5:302022-01-10T15:53:07+5:30
आजकाल कॅशलेस पेमेंटचा ट्रेण्ड आहे. पेटीएम, गुगल पे, फोनपे सारख्या पेमेंट अॅप्ससह ऑनलाइन व्यवहार खूप सोपे झाले आहेत. मात्र, त्यांचा ट्रेण्ड वाढल्याने आता त्यात फसवणूकही वाढू लागली आहे. अशी अनेक प्रकरणे रोजच चर्चेत असतात. नुकताच मुंबईत देखील अशीच एक घटना घडलेली आहे हॉटेलमध्ये तीन तरुणांनी वास्तव्य केलं यानंतर बिल ऑनलाइन पेटीएम द्वारे केलं , मात्र पैसे हे हॉटेल मालकाला आलेच नाहीत . त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी चौकशी केली असता बनावट ऑनलाईन पेमेंट ॲप द्वारे फसवणूक केल्याचं प्रकरण उघड झालेल आहे. त्यात समाज माध्यमावर कशाप्रकारे ऑनलाइन पेमेंट करून फसवणूक केली जाते असा एका तरुणीचा व्हिडिओ देखील वायरल होतोय . तर कशाप्रकारे ऑनलाईन ॲपद्वारे फसवणूक केली जाते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.