सावंतवाडी- नारायण राणे यांना काँग्रेसमध्ये येऊन बारा वर्षे झाली. त्यात त्यांना अनेक पदे दिली. असे असताना त्यांनी काँग्रेस सोडताना आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले. मग या बारा वर्षांच्या काळात त्यांनी आमच्यासारख्या निष्ठावंतांवर किती वेळा अन्याय केला? त्याला काय म्हणायचे? याची तक्रार कोणाकडे करायची? असा सवाल काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी नारायण राणेंना विचारला आहे. जर तुम्ही चांगले काम केले असे म्हणता, तर काँग्रेसमध्ये राहणा-यांना धमकावता कशाला, असा सवालही त्यांनी यावेळी केला.