मातोश्रीभोवती फास घट्ट, ठाकरेंच्या खास माणसांचीच चौकशी का होतेय?IT Department Raid | Yashwant Jadhav
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 23:04 IST2022-02-28T23:03:29+5:302022-02-28T23:04:15+5:30
मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इनकम टॅक्सनं छापा टाकला. जाधव हे मातोश्रीचे आणि ठाकरे कुटुंबाचे खास समजले जातात. चार दिवसापासून यशवंत जाधव यांच्या घरी झडती सुरू होती. तब्बल ७२ तासानंतर आयकर विभागानं धाडी थांबवल्या. पण कुठेही चर्चेत नसणाऱ्या यशवंत जाधवांवर धाडी का पडल्या? मुंबई महापालिका निवडणूक उंबरठ्यावर आहे आणि महापालिकेच्या आर्थिक नाड्या ज्यांच्या हातात आहेत त्याच यशवंत जाधवांची निवड कुणी केली, आता फक्त यशवंत जाधवांचा मुद्दा नाही पण जे मातोश्रीच्या जवळ आहेत, ठाकरेंच्या जवळ आहेत फक्त त्यांच्यावरच धाडी का पडतायंत, त्यांचीच का चौकशी होतेय यावरच बोलुयात..