आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील विरोधकांना असं का म्हणाला? R R Patil | Rohit Patil | NCP
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 02:27 PM2021-12-21T14:27:10+5:302021-12-21T14:27:53+5:30
Rohit R R Patil : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर आबा अर्थात आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील हे सध्या चर्चेत आहेत... यांच्याविरोधात सर्वपक्षीय एकवटलेत... सांगली जिल्ह्यात रोहित पाटील कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत प्रचार करतायत... त्यांना हरवण्यासाठी सर्वच पक्ष एकत्र आलेत... त्यामुळे निवडणूक चांगलीच रंगतदार झालेय... रोहित पाटील यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला.. त्यानंतर अनेकांना आबांच्या आठवणीनं गहिवरुन आलं... अशात रोहित पाटील यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात, आर आर पाटलांचं नाव घेतलं.. आणि सगळेच भावूक झाले...