Next

Nitesh Rane सिंधुदुर्गात येताच शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा का झाला? ShivSena BJP Sindhudurg

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 10:44 PM2022-02-14T22:44:59+5:302022-02-14T22:45:31+5:30

सुप्रीम कोर्ट ते सेशन कोर्ट जामिनासाठी खेपा मारल्यानंतर भाजप आमदार नितेश राणेंना अखेर जामीन मिळाला. नितेश राणे सिंधुदुर्गात दाखल झाले. जामिनाच्या अटीनुसार ओरोस पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी हजेरीही लावली. पण त्याचदरम्यान कुडाळमध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. राणे सिंधुदुर्गात दाखल होऊन २४ तास उलटत नाहीत तोच सेना-भाजपचे कार्यकर्ते भिडले. विशेष म्हणजे हा राडा शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासमोरच झाला, काय झालं कुडाळमध्ये, सिंधुदुर्गात वातावरण का तापलंय, ही शिवसेना विरुद्ध राणे संघर्षाची नवी नांदी म्हणायची का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात नितेश राणे ओरोसमध्ये दाखल झाले तेव्हा काय झालं..