आरोपांची राळ उठवणारे सोमय्या मुलाच्या जामीनासाठी धावाधाव का करतायंत? Kirit Somaiya Son Neil Somaiya
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 04:41 PM2022-03-02T16:41:57+5:302022-03-02T16:42:25+5:30
Mumbai court rejects anticipatory bail plea filed by BJP leader Kirit Somaiya's son : Kirit Somaiya Neil Somaiya will go to Jail ? Sanjay Raut | उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, अनिल परब, अजित पवार, नवाब मलिक यशवंत जाधव, प्रताप सरनाईक, भावना गवळी... या साऱ्यांविरोधात आरोपांची राळ उठवणारे, अगदी बैलगाडीभर पुरावे देणारे किरीट सोमय्या...आता स्वतच्या मुलाला जामीन मिळावा म्हणून धावाधाव करतायंत. एकीकडे ठाकरे सरकारच्या डर्टी डझन मंत्र्यांची यादी सोमय्यांनी जाहीर केली पण त्याचवेळी त्यांना स्वतच्या मुलाच्या जामीनासाठी धावपळ करावी लागतेय. महत्त्वाचं म्हणजे संजय राऊतांच्या आरोपानंतर सोमय्यांची धावाधाव सुरु झालीय. पण सोमय्यांच्या मुलानं केलंय काय, जर गुन्हाच केला नाही तर मग सोमय्या जामिनासाठी धावाधाव का करतायंत, फक्त आरोप झाले म्हणून अटक होईल असं सोमय्यांना का वाटतंय, नील सोमय्यांनी खरंच बँक घोटाळा केलाय का, सोमय्यांच्या मुलावर टांगती तलवार का आहे यावरच बोलुयात पुढच्या काही मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात नील किरीट सोमय्यांचा प्रकरण नेमकं काय आहे ते..