उत्पल पर्रिकर यांना बाबूश मॉन्सेरात यांचा इतका राग का आहे? Babush Monserrate | Utpal Parrikar
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 02:42 PM2022-01-24T14:42:41+5:302022-01-24T14:43:13+5:30
Goa Election 2022 News : गोव्यात फडणवीसांनी भाजपला पुन्हा सत्तेत आणण्याचा विडा उचललाय... पण गोव्याच्या राजकारणात जे काही घडतंय, ते जबरदस्त नाट्यमय आहे... मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर हे आता पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत... त्यांनी भाजपला रामराम ठोकलाय.. तर भाजपने बाबूश मॉन्सेरात यांना पणजीतून निवडणुकीचं तिकीट दिलंय.. मुख्य म्हणजे हे बाबूश काँग्रेसमध्ये भाजपत आलेले आहेत.. आणि कधी काळी तर ते गोव्यातील भाजप सरकारसाठी खलनायकही ठरले होते.. यात एक नवा ट्वीस्ट आलाय.. तो म्हणजे उत्पल पर्रिकर यांनी आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी एक अट ठेवलेय.. ती म्हणजे भाजपने चांगला उमेदवार दिला, तर मी अपक्ष लढणार नाही.. आता चांगला उमेदवार असं जेव्हा पर्रिकर म्हणतायत तेव्हा बाबूश मॉन्सेरात यांच्यात त्यांना नेमकं काय वाईट दिसतंय.. फडणवीसांनी त्या मॉन्सेरात यांच्यावर विश्वास ठेवून पर्रिकरांशी पंगा घेतलाय... त्यांचा इतिहास नेमका काय आहे, याविषयी सविस्तर बोलू... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...