Next

Shiv Sena-NCP च्या कार्यकर्त्यांना एकत्र निवडणुका का लढायच्या नाहीत? Maharashtra Municipal Elections

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 08:53 PM2022-02-13T20:53:41+5:302022-02-13T20:54:04+5:30

राज्याच्या पातळीवर महाविकास आघाडीचे नेते आपण किती एक आहोत हे दाखवत असतात. ठाकरे सरकार ५ वर्ष चालेलच असं सांगत असतात. पण स्थानिक पातळीवर मात्र काहीतरी वेगळंच चाललंय म्हणजे येणाऱ्या महापालिका निवडणुका एकत्र लढायच्याच नाहीत यावर सेना-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठाम आहेत. आता कार्यकर्तेच एकत्र लढायला इच्छुक नाहीत त्यामुळे आघाडीसंबंधी बोलण्यावर नेते ठाम नाहीत. जर तरवर वेळ मारुन नेतायत. त्यातच एकत्र लढण्यावर एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड या महाविकास आघाडीतल्या दोन्ही हेविवेट नेत्यांनी, राज्यातल्या मंत्र्यांनी एक मोठं विधान केलंय ज्यामुळे चर्चांना उधाण आलंय...