Next

या २ ठिकाणी नारायण राणेंना धक्का का बसला? काय घडलं? | Narayan Rane | Nitesh Rane | Election Result

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 14:31 IST2022-01-20T14:31:15+5:302022-01-20T14:31:39+5:30

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक राणेंनी जिंकली... आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात राणेंची चांगलीच हवा झाली... संतोष परब हल्ला प्रकरणानंतर निर्माण झालेल्या शिवेसना राणे संघर्षातही राणे पुढे निघून गेले.. अद्यापही राणेंचे पुत्र नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असली.. तरीही त्यांना अटेकपासून कायमच दिलासा मिळत गेला... त्यामुळे जिल्हा बँकेतील निकालानंतर नगरपंचायत निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.. विशेषतः कुडाळ नगरपंचायतीच्या निकालाकडे.. पण इथे फासे उलटे पडलेत.. आणि नारायण राणे यांना या निकालातून धक्का बसलाय... तो कसा आणि का? नेमकं काय घडलंय जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...