Next

खरंच गडकरी सेना-भाजपचं पुन्हा जुळवतील? Nitin Gadkari Devendra Fadnavis | Shiv Sena - BJP

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 04:01 PM2022-01-06T16:01:00+5:302022-01-06T16:01:21+5:30

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून सेना-भाजप युतीत बेबनाव निर्माण झाला..भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदाचे सम-समान वाटपास भाजपने नकार दिल्याने युती तुटली. त्यानंतर, राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. आणि या सरकारला लवकरच अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण होईल.. मात्र मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना एकत्र येतील अशा चर्चा सुरू आहेत..शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल्ल सत्तार यांनी नितीन गडकरींनी मनात आणलं तर शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येऊ शकते, असे म्हटलं होतं. सत्तार यांच्या त्या विधानाला आता भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलय...