Next

नितेश राणेंना अटकेपासून संरक्षण मिळणार का? Nitesh Rane arrest | Narayan Rane | Sindhudurg

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 14:45 IST2022-01-04T14:44:29+5:302022-01-04T14:45:05+5:30

नितेश राणे हे सध्या फरार आहेत.. मागचे पाच दिवस ते कुठेच दिसले नाहीत... अधिवेशनात विधानभवनाच्या पायऱ्यांवर म्याव म्याव करताना नितेश राणे दिसले खरे.. पण त्यानंतर त्यांच्या मागे जी काही पिडा लागली की नितेश राणे हे गायब झाले, अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस नितेश राणे गैरहजर होते... सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक झाली, निकाल लागला.. भाजपची सत्ताही आली.. पण नितेश राणे काही समोर आले नाहीत... ते कुठे आहेत असा प्रश्न पत्रकारांनी अनेकदा नारायण राणेंनाही विचारला.. तेव्हा राणेंच्या उत्तराने स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणेच अडचणीत आले..