रेल्वे आता खासगी कंपनीकडे जाणार? Indian Railways will privatised? Ramayana Express
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 02:24 PM2021-12-28T14:24:14+5:302021-12-28T14:24:32+5:30
रामायण एक्स्प्रेसनंतर आता कुराण, बायबल एक्स्प्रेस धावणार? गेल्या महिन्यात प्रभू श्रीरामावर श्रद्धा असलेल्या भाविकांसाठी भारतीय रेल्वेने रामायण यात्रा एक्सप्रेस सुरू केली आहे. याच पार्श्वभमीवर रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांना एक सवाल करण्यात आला. याचे उत्तरही अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टपणे दिले आहे. रामायण एक्सप्रेसप्रमाणेच बायबल, कुराण एक्सप्रेस, गुरुग्रंथ एक्सप्रेसही देशात धावू शकतात का? असा सवाल अश्विनी वैष्णव यांना करण्यात आला होता. यावर रामायण एक्सप्रेस ही फक्त सुरुवात आहे, भविष्यात काहीही होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. हिंदी न्यूज चॅनेलच्या एका कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे सहभागी झाले होते. यावेळी जगातील इतर देश छोट्या-छोट्या गोष्टी अशा प्रकारे दाखवतात, जणू काही मोठी गोष्ट आहे, त्याला मोठा इतिहास आहे. आपल्या इथे खूप वारसा आहे. आमचे किल्ले, सफारी, आयुर्वेद, मग ते लोकांना दाखवू नये का? असे ते म्हणाले. तसेच, बायबल, कुराण, गुरुग्रंथ एक्सप्रेस रामायण एक्सप्रेसप्रमाणे धावतील का?