अजूनही 'त्या' गावात पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावं लागतंय... | Nashik Trimbakeshwar | Dugarwadi
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 03:48 PM2022-02-03T15:48:33+5:302022-02-03T15:48:57+5:30
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, पण काही आम्हांल पाणी मिळला नाय, गावातलं डवरं मरुन गेलं पण दुष्काळ आमचे पाचवील पुजलाय, त्यो काय पाठ सोडायला तयार न्हाई, आम्हांक कोणीच लक्ष देईना झालाय… ! हे बोल त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी येथील गावकऱ्यांचे! १९७२ चा दुष्काळ आठवला तरी अंगावर काटे येतात. आणि त्याच वर्षी दुगारवाडी या छोट्याश्या वाडीची स्थापना झाली.. दूगारवाडी अवघी दोनशे तीनशे लोकांची वस्ती. मात्र अद्यापही पायाभूत सुविधांसह पाणी ही समस्या येथील गावकऱ्यांना भेडसावत आहे. मात्र यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली असतांना अद्यापही दूगारवाडीकरांच्या नशिबी पाण्याचा संघर्ष सुरूच आहे