'या' विवाह सोहळ्याची आहे राज्यभर चर्चा | Wedding | Shahunagar | Maharashtra News
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 05:02 PM2021-04-03T17:02:49+5:302021-04-03T17:03:14+5:30
शाहूनगरीतील सत्यजीत संजय यादव आणि मारशा नदीम मुजावर यांचा हा विवाह सोहळा खास आहे....सत्यजीत संजय यादव आणि मारशा नदीम मुजावर या बालपणापासूनच्या सवंगड्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं... यानंतर घरच्यांची परवानगी घेत एकाच मंडपात मंगलाष्टका आणि निकाह कबूल असा दुहेरी संगम त्यांनी साधला... मुलगा हिंदू अन् मुलगी मुस्लीम धर्मीय अशा पुरोगामी विचारांच्या विवाहाची यानंतर राज्यभर चर्चा सुरु झाली... रंकाळा परिसरात राहणारा सत्यजित हा स्थापत्य अभियंता, तर मारशा ही वास्तुविशारद आहे... दोघंही एकमेकांना बारा वर्षांपासून ओळखतायत... त्यांनी १९ मार्च २०२१ ला एका हाॅटेलमध्ये मौलानांच्या उपस्थितीत मुस्लीम पद्धतीने निकाह केला.... त्यानंतर हिंदू पद्धतीने मंगलाष्टका आणि सप्तपदी विधी झाला.... पण लग्नाला परवानगी मिळेपर्यंत दोघांनाही धाकधूक ही होतीच... घरातील वडीलधाऱ्यांच्या संमतीनेच हा विवाह करण्याचं दोघांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे विवाह सोहळा संपन्न झाला..