अमरावती : तिवसा तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा हाहाकार माजला. पाण्याचा प्रश्न सुटावा याकरिता मोर्शीतील अप्पर वर्धा धरणातून वर्धा नदीला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली. जिल्हाधिकारी यांनी रविवारी रात्री 12 वाजता अपर वर्धा धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. मात्र सिंचन विभाग आणि आमदार अनिल बोंडे यांनी पाणी सोडण्यावर अडमुठी भूमिका घेतले. म्हणून यशोमती ठाकूर आज आक्रमक झाल्या. आज सोमवारी सायंकाळी अप्पर वर्धा धरणाचं पाणी पिण्यासाठी सोडण्यात येणार आहे.( वीडियो- मनीष तसरे,अमरावती)