अभिनयाची ‘सेकंड इनिंग’ सुरू करायचीय - मिलिंद इंगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 09:09 PM2018-02-02T21:09:12+5:302018-02-02T21:09:16+5:30
नागपूर : आत्माराम भेंडेंना त्यांच्या मालिकेसाठी एक गायक-नट हवा होता. त्यांचा प्रदीर्घ शोध माझ्याजवळ येऊन थांबला आणि आव्हानद्वारे मी ...
नागपूर : आत्माराम भेंडेंना त्यांच्या मालिकेसाठी एक गायक-नट हवा होता. त्यांचा प्रदीर्घ शोध माझ्याजवळ येऊन थांबला आणि आव्हानद्वारे मी छोटया पडद्यावर झळकायला लागलो. माझा अभिनय प्रेक्षकांना आवडला आणि पाच भागांची मालिका चक्क ५० भागांपर्यंत पोहोचली. पुढे गायनाच्या ओघात अभिनय मागे पडला. पण, आता अभिनयाची ‘सेकंड इनिंग’ सुरू करायचीय. दमदार भूमिकेची प्रतीक्षा करतोय. ती मिळाली की मी पुन्हा पडद्यावर दिसेल, अशी खास माहिती गायक-संगीत दिग्दर्शक मिलिंद इंगळे यांनी दिली. ते शुक्रवारी लोकमत कार्यालयात आले असता त्यांच्या सांगितिक प्रवासाचा ‘गारवा’ चौफेर बहरला. यावेळी त्यांनी गारवाच्या टायटल साँगसोबतच किशोर कुमार यांच्या आवाजातील जीवन से भरी तेरी आखें...हे गाणे सादर केले. त्या गाण्यांची ही खास झलक खास आमच्या ‘आॅनलाईन’ वाचकांसाठी...