नागपूर : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ नागपूरात रविवारी यशवंत स्टेडियम ते संविधान चौक रॅली काढण्यात आली. लोकाधिकार मंचतर्फे काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते. नितीन गडकरी , माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.