नांदेड : एमआयएमला सोडून प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत यावे असे आवाहन काँग्रेस वारंवार करीत आहे. आज मी काँग्रेसला जाहीर ऑफर देत आहे. अॅड. आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील कार्य, कर्तृत्व, त्याग आणि ताकदीचा त्यांनी योग्य तो सन्मान ठेवावा. तसे केल्यास एमआयएम महाराष्ट्रात एकही जागा लढणार नाही. आता काय तो निर्णय काँग्रेसने घ्यावा, असे जाहीर आव्हान एमआयएमचे प्रमुख खा. असुदोद्दीन ओवेसी यांनी दिले.