नाशिकमधील पांडव लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या आणि नाशिक महापालिकेने साकारलेल्या बुद्ध स्मारकात सकाळपासूनच गर्दी होऊ लागली आहे. बुद्ध पौर्णिमेनिमित्त या स्मारकात रविवारी (29 एप्रिल)संध्याकाळपासूनच भिख्खूंच्या उपस्थितीत प्रार्थना करण्यात येत आहेत.