नाशिक - येथील सातपूर शिवारातील वनविभागच्या वन कक्ष क्रमांक २२२ येथील डोंगरावर अर्थात ‘देवराई’येथे पर्यावरण दिनाच्या औचित्यावर वचनपूर्ती सोहळा आपलं पर्यावरण व नाशिक पश्चिम वनविभागाने साजरा केला. नामशेष झालेल्या दुर्मिळ अशा १६ प्रजातीच्या औषधी रानवेलींच्या एक हजार रोपांची लागवड यावेळी नाशिककरांनी केली. एकू णच देवराईवर आता अकरा हजार भारतीय प्रजातीच्या वृक्षांसोबत वेलींची भर पडली आहे. एक परिपूर्ण जंगल विकसीत करण्याचा संस्थेने ध्यास घेतला आहे. ( व्हिडिओ - अझहर शेख)