Next

दमणगंगा - पिंजळ प्रकल्प हा नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहाच्या विरोधात आहे - जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 20:09 IST2017-10-09T20:09:05+5:302017-10-09T20:09:26+5:30

नाशिक:  दमणगंगा - पिंजळ प्रकल्प हा नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहाच्या विरोधात आहे. नाशिक जिल्ह्याशी निगडित या प्रकल्पाच्या माध्यमातून मूठभर शहरी ...

नाशिक:  दमणगंगा - पिंजळ प्रकल्प हा नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहाच्या विरोधात आहे. नाशिक जिल्ह्याशी निगडित या प्रकल्पाच्या माध्यमातून मूठभर शहरी भांडवलदारांच्या हाती पाणी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकसह तुटीच्या जलक्षेत्रातच या प्रकल्पांचे पाणी वापरले पाहिजे, असे मत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी सांगितले. महाराष्ट्र आणि गुजरातच्या हद्दीवर असलेल्या दमणगंगा-पिंजळ लिंक प्रकल्प आणि नारपार प्रकल्पातून गुजरातला पाणी देण्याचा प्रस्ताव नदी जोड प्रकल्पाअंतर्गत सरकारने तयार केला आहे, त्यासंदर्भात राजेंद्रसिंह येथील एका पत्रकार परिषदेत  बोलत होते. 

टॅग्स :पाणीWater