नाशकात सकल नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 18:57 IST2017-11-17T18:57:21+5:302017-11-17T18:57:36+5:30
नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाविषयी काढलेल्या कथित अनुदगारामुळे आज सकल नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने ...
नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाविषयी काढलेल्या कथित अनुदगारामुळे आज सकल नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन करण्यात आले. तसेच फडणवीस यांनी तातडीने समाजाची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.