नाशिक : गंगा पूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारपासून आज पहाटेपर्यंत जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे धरणसाठा दुपारी 83 टक्क्यांवर पोहोचला आहे. परिणामी दुपारी दोन वाजेपासून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सोमवारी सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत पारंपरिक पर्जन्यमापक असलेल्या दुतोंड्या मारुतीची मूर्ती कमरेपर्यंत बुडाली. सायंकाळी सहा वाजता 7 हजार 833 क्यूसेसपर्यंत विसर्ग रात्रीपासून वाढविण्यात आल्याने गोदावरी नदीला पूरपरिस्थिती कायम आहे.(व्हिडीओ : अझहर शेख)