Next

नाशिककरांचे आकर्षण ठरतंय इकोफ्रेंडली अमृतवन उद्यान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 03:21 PM2018-07-09T15:21:06+5:302018-07-09T15:21:18+5:30

नाशिक : महापालिकेने सुमारे साडेसतरा एकर जागेत केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून हे उद्यान साकारण्यात आले आहे. या उद्यानाला सुमारे ...

नाशिक : महापालिकेने सुमारे साडेसतरा एकर जागेत केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून हे उद्यान साकारण्यात आले आहे. या उद्यानाला सुमारे ३ कोटी १६ लाख रुपयांचा खर्च आला असून, यापैकी ५० टक्के रक्कम केंद्र व २५ टक्के राज्य सरकारकडून महापालिकेला उपलब्ध झाली. उर्वरित २५ टक्के रकमेचा भार महापालिकेने उचलला आहे. उद्यान विकसित करताना अमृत योजनेच्या संकल्पनेनुसार कमीत कमी सीमेंट कॉँक्रीटचा वापर करण्यावर भर दिला गेला आहे. या उद्यानामध्ये टिकाऊ वस्तूंचा शोभेसाठी वापर केला गेला आहे. स्वच्छतागृहांची उभारणी करतानाही सीमेंट कॉँक्रीट किंवा विटांचा उपयोग करण्यात आलेला नाही तर केवळ बांबूच्या वापराला प्राधान्य दिले गेले आहे. दोन वर्षांमध्ये हे उद्यान पूर्णत: विकसित झाले असून, लवकरच त्याचे हस्तांतरण महापालिका प्रशासनाकडे करण्यात येणार आहे.(VIDEO - अझहर शेख, नाशिक)