...अखेर 'त्या' बछड्याला मिळाली मायेची ऊब!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 07:34 PM2019-08-14T19:34:42+5:302019-08-14T20:52:37+5:30
- अझहर शेख, नाशिक : निफाड तालुक्यातील वनविभाग पूर्व येथील येवला वनपरिक्षेत्राच्या हद्दीत असलेल्या गाजरवाडी गावातील एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये रात्रीच्या सुमारास ...
- अझहर शेख, नाशिक : निफाड तालुक्यातील वनविभाग पूर्व येथील येवला वनपरिक्षेत्राच्या हद्दीत असलेल्या गाजरवाडी गावातील एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये रात्रीच्या सुमारास अनावधानाने वाट चुकलेला बिबट्याचा ५ महिन्यांचा बछडा पडला. शनिवारी (दि.१०) तारखेला या बछड्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षित ‘रेस्क्यू’ केले; मात्र आईपासून ताटातूट झालेल्या बछड्याला पुन्हा आईच्या कुशीत सोपविण्याचे आव्हान उभे राहिले. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून प्रयत्न वनविभागाकडून केले जात होते; अखेरीस मंगळवारी रात्रीच्या सुमारास प्रयत्नांना यश आले आणि बिबट मादीने आपल्या बछड्यालाजवळ घेत नैसर्गिक अधिवासात पलायन केले.