नाशिक - रांगोळ्या आणि तोरण बांधून सज्ज झालेल्या शाळांमध्ये मुलांचे आगमन होताच गुलाबाची फुलं तसेच चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. आणि शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात सुरू झाला. मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी यासाठी दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे स्वागत उत्साहात केले जाते. नाशिक शहरासह जिल्ह्यात आज सर्व मराठी शाळा सुरू झाल्या. त्यासाठी रविवारपासून शाळांमध्ये सज्जता होती. शाळेत मुलं येताच त्यांचे अनोख्या उत्साहात स्वागत करण्यात आले तसेच पहिल्याच दिवशी संस्थाचालक आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते गणवेषांचे वाटप करण्यात आले.(व्हिडीओ - राजू ठाकरे)