नाशिक जिल्ह्यातील कर्जबाजारी भूमिहीन गरीब अनाथ शेतकरी यांच्या मुला-मुलींच्या विवाहाचा विकास खर्च सोडविण्याच्या उद्देशाने धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य या संकल्पनेनुसार आत्महत्याग्रस्त व कर्जबाजारी शेतकरी गरीब कुटुंबियांच्या सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. सामुदायिक विवाह सोहळा समिती यासाठी गठित केली गेली. या सोहळ्यात जिल्ह्यातील 101 वधू-वर जोडप्यांचे विवाह पारंपरिक पद्धतीने लावण्यात आला.