- रामदास शिंदेपेठ- होळीचा सण देशभर विविध रंगांची उधळण करीत साजरा करण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे आदिवासी व दुर्गम भागातील कष्टकऱ्यांची मात्र वेगळीच धावपळ दिसून येते. शहरी भागात चौकाचौकात सोसायट्या व बंगल्यासमोर लहान लहान होळी पेटवून सण साजरा केला जातो. यासाठी लागणाऱ्या सर्व गोवऱ्या पेठ, सुरगाणा, त्र्यंबक या तालुक्यांतील आदिवासी बांधव आणत असतात. वर वर दिसणाऱ्या या गोवऱ्या थापायची सुरुवात तशी दिवाळीपासून सुरू करण्यात येते.