Next

काळाराम मंदिरातील प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला सूर्य किरणांचा चरणस्पर्श

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 10:16 AM2018-04-03T10:16:31+5:302018-04-03T10:16:43+5:30

नाशिक :  सध्या राज्यातील अनेक ठिकाणच्या मंदिरांमध्ये किरणोत्सव साजरे होताना दिसत आहेत. नाशिकचे प्राचीन श्री काळाराम मंदिर पूर्वाभिमुख असून ...

नाशिक :  सध्या राज्यातील अनेक ठिकाणच्या मंदिरांमध्ये किरणोत्सव साजरे होताना दिसत आहेत. नाशिकचे प्राचीन श्री काळाराम मंदिर पूर्वाभिमुख असून आज सकाळी सूर्योदयानंतर मंदिरात प्रभू रामचंद्र तसेच सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींच्या चरणावरून थेट मूर्तींवर काही काळ विसावली. सूर्य प्रकाशात या मूर्ती अधिक उजळून निघाल्या. किरणोत्सवाचा हा खेळ पाहण्यासाठी भल्या सकाळी भाविकांची गर्दी झाली होती.