येवला- गच्चीवर पतंग उडविण्यासाठी आबालवृद्धांनी केलेली गर्दी ......निमित्त संक्रांतीचे.... .... पतंग काटली तर मोठ्याने होणारा काटे ....काटेचा होणारा सामूहिक जल्लोष, यातच ध्वनिक्षेपकावरून पतंग बढाव... बढाव... बढाव...! असे म्हणणारी मुले...... येवल्याच्या सुप्रसिद्ध हलकडी, बॅडचा आवाज यामुळे सर्वत्र आनंददायक, उत्साहवर्धक वातावरणात, निळ्याशार आकाशात क्षितिजापर्यंत विविधरंगी लहान मोठ्या आकाराच्या पतंगांनी सजलेले मनमोहक दृष्य येवला शहराच्या आकाशात शनिवारी दिसले.