Next

नाशिकमध्ये भरला पितरांचा महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 04:06 PM2018-10-06T16:06:26+5:302018-10-06T16:09:49+5:30

नाशिक - पितृपक्ष असला की पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि त्यांना तृप्त करण्यासाठी नागरिक विधी करतात आणि त्यासाठी खर्चही ...

नाशिक - पितृपक्ष असला की पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि त्यांना तृप्त करण्यासाठी नागरिक विधी करतात आणि त्यासाठी खर्चही करतात. मात्र नाशिकच्या नसती उठाठेव मंडळाच्या वतीने अनोखा पितरांचा महोत्सव साजरा केला जातो. अनाथ आणि असहाय्य व्यक्तींना मदत केल्यानेच पितर तृप्त होतात असा संदेश देण्यासाठी महोत्सव साजरा केला जातो. नागरिकांना आवाहन करून धान्य आणि अन्य साहित्य रोख रक्कम जमा करून ती नाशिकमधील विविध अनाथ दिव्यांगांच्या संस्था आणि वृद्धाश्रम यांना मदत केली जाते. गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून यंदाही शनिवारी हा पितरांचा महोत्सव साजरा करण्यात येत आहे अशी माहिती नसती उठाठेवचे संस्थापक बापू कोतवाल यांनी दिली.  व्हिडिओ - प्रशांत खरोटे