पेठ (नाशिक), महाराष्ट्राच्या गुजरात सीमेलगत आदिवासी भागात आजही पारंपरिक पद्धतीने होळीचा उत्सव साजरा केला जातो. गावाच्या मुख्य चौकात सुवासिनी आरती व नैवेद्याचे ताट घेऊन एकत्र येतात. टाळ मृदुंग व पारंपरिक आदिवासी वाद्य वाजवून होळीची आरती केल्यानंतर बोंबा मारुन होळी पेटवली जाते. रात्रभर अबालवृद्ध होळीभोवती ताल धरून नृत्य करत असतात.