नाशिकमध्ये पेन्शर्सधारकांनी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढला. आमदारांची पेन्शन वाढ झाली परंतु देश कष्टाने उभा करणाऱ्या कामगारांना पेन्शनवाढ का नाही?, हा जाब विचारण्यासाठी गुरूवारी (7 फेब्रुवारी) खासदार हेमंत गोडसे यांच्या त्र्यंबक रोडवरील कार्यालयाजवळ पेन्शनधारक फेडरेशनने थाळीनाद आंदोलन केले.