नाशिक- पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात आज नाशिक मध्ये शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य भरडले जात असून दर नियंत्रित करण्यासाठी जी एस टीच्या कक्षेत इंधन आणावे अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.