राष्ट्रवादीतर्फे दिंडोरीत हल्लाबोल आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 21:56 IST2017-11-27T21:56:40+5:302017-11-27T21:56:57+5:30
दिंडोरी : अच्छे दिनचे स्वप्न दाखवत शिवसेना भाजपा युतीने सत्ता मिळवली मात्र तीन वर्षे झाले तरी सरकारने आश्वासने न ...
दिंडोरी : अच्छे दिनचे स्वप्न दाखवत शिवसेना भाजपा युतीने सत्ता मिळवली मात्र तीन वर्षे झाले तरी सरकारने आश्वासने न पाळता फसव्या घोषणा करत खोट्या जाहिरातीचा सपाटा लावला. जनता आता त्यांच्या खोटरडेपणाला कंटाळली असून सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरत सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन पुकारले आहे. जनता आता या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी दिंडोरी येथे केले.