Next

शिवसैनिकांनी महागाईच्या रावणाच्या पुतळ्याचे केले दहन; सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 02:18 PM2017-09-30T14:18:11+5:302017-09-30T14:33:06+5:30

शालीमार येथील बी.डी.भालेकर मैदानात महागाईच्या रावणाचा पुतळा फुंकण्यात आला. यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, विजय करंजकर, संजय चव्हाण यांच्यासह महिला पदाधिकारी-कार्यकर्ते हातात भगवे ध्वज घेऊन उपस्थित होते.

ठळक मुद्देशिवसैनिकांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करुन वाढत्या महागाईला सरकार जबाबदार असून त्याचा निषेध म्हणून विजयादशमीच्या मुहूर्तावर शिवसेनेच्या वतीने महागाईच्या रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

नाशिक : पेट्रोल-गॅसची वाढते दर सोबतच अन्य सर्व गृहपयोगी वस्तूंसह किराणा मालाचे वाढते भाव यासर्वमुळे दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतून उत्साह गायब झाला आहे. वाढत्या महागाईला सरकार जबाबदार असून त्याचा निषेध म्हणून विजयादशमीच्या मुहूर्तावर शिवसेनेच्या वतीने महागाईच्या रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.शहरातील शालीमार येथील बी.डी.भालेकर मैदानात महागाईच्या रावणाचा पुतळा फुंकण्यात आला. यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, विजय करंजकर, संजय चव्हाण यांच्यासह महिला पदाधिकारी-कार्यकर्ते हातात भगवे ध्वज घेऊन उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करुन महागाईवर नियंत्रण मिळविण्याची मागणी केली.http://www.lokmat.com/videos/nashik/nashik-nashiks-daily-burning-combustion-shivsena/