पंचवटी : बनारस येथील गंगा आरतीच्या धर्तीवर गोदावरी आरतीचा गुरुवारी सायंकाळी शुभारंभ करण्यात आला. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख हस्ते आरती करण्यात आली. आरतीसाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने निधी मंजूर केला असून, आगामी शंभर दिवस खर्च मंजूर पैशातून केला जाणार आहे, त्यानुसार दैनंदिन सायंकाळी ७ वाजता रामकुंडावर गोदा आरती करण्यात येणार आहे, असे रावल यांनी सांगितले. गोदाआरती यापुढे अखंड सुरु राहील आरतीमध्ये खंड पडणार नाही, असे महाजन यांनी सांगितले.